बिडकीन, (प्रतिनिधी): पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या खानावळमध्ये प्रतिबंधित गोवंश जातीचे मांस विक्री करणाऱ्या एका व्यक्तीस पोलिसांनी ताब्यात घेतले असून, खानावळ चालकाविरुद्ध गुन्हा करण्यात आला आहे.
बिडकीन निलजगाव रस्त्यावर पोलीस पाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या अफ्फान इस्लामी खानावळमध्ये अनेक दिवसांपासून सर्रासपणे प्रतिबंधित गोवंश जातीचे मांस विक्री जात होती. २५ जुलै रोजी देखील या खानावळीत गोवंश मांस विक्री केली जात असल्याची माहिती मिळाली.
बिडकीन पोलिसांनी सकाळी ११.२५ वाजता छापा मारून खानावळ चालक आरोपी मुजम्मील नूर इनामदार, अधिकारी अनिकेत रामेश्वर लंभाडे (२५, रा. भारतनगर, बिडकीन) यास विक्रीच्या उद्देशाने ठेवलेले गोवंश जातीचे मांसासह ताब्यात घेतले आहे.
या कारवाईमध्ये २ हजार रुपये गोवंश जातीचे मांस, साहित्य असे ५०० रुपयांचे साहित्य जप्त करून मुद्देमाल ताब्यात घेतला. दरम्यान, पशुधन विकास यांनी पथकासह घटनास्थळी मांसाचे नमुने घेऊन पंचनामा केला. बिडकीन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
अपर पोलीस अधीक्षक आरती पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक नीलेश शेळके, पोहेकॉ. गणेश खंडागळे, पोलीस अंमलदार दिनेश चव्हाण आदींनी कारवाई केली. पोलीस हवालदार सोमनाथ जाधव पुढील तपास करीत आहेत.













